Back to feed
K
Kabir Singh Social · Marathi · Social_Awareness

जन्म घेतलास पित्याच्या घरी, मृत्यू येणार पतीच्या दारी, असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तुच एक मालकिन खरी. परके धन म्हणत म्हणत आपले सुद्धा परक्यासारखं वागतात, सासरी गेल्यावर परके तर सासरपणाला जागतात. "मिळुन-मिसळुन रहावं" ही तर जन्मापासुनचीच शिकवण खरी, असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तुच एक मालकिन खरी. मुले, घरकाम, नोकरी शिवाय संसारच आजकाल धकत नाही, कौतुकाची दोन फुले नवरासुद्धा कधी वहात नाही. कितिही त्रास झाला तरी मुग गिळुन गप्प बसावं लागतं, कारण म्हणतात ना, सासरी जाताना तोंड शिवुन जावं लागतं. प्रत्येक वादाचा शेवट असतो,"जा मग तुझ्या बापाच्या घरी," असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तुच तुझी मालकिन खरी. कधी मिळणार प्रत्येक स्त्री ला तिच्या हक्काचं घर, ज्यातली प्रत्येक गोष्ट तिच्या आवडी नुसार होणार, फर्नीचर, कपडे , स्वयंपाकच काय तर तिच्या आनंदाच गाणं ती मोठ्या आवाजात गाणार.तिच्या सुखावर खुश होऊन लक्ष्मी ही येईल मग तुमच्या घरी, मोकळा श्वास घेत अभिमानाने जगु शकेल ती ज्या घरी त्याच घरची असेल ती एक मालकिन खरी.... 👌👌👌

55 likes 71 shares
WhatsApp