जरूर वाचा आणि विचार करा मी आणि माझे सतत बदलणारे फालतू अभिमान.... मी मुंबईत जन्मलो म्हणून मी "मुंबईकर", मग मला बाकी सगळे उपरे वाटणार... गाव रत्नागिरी म्हणून मी "रत्नागिरीकर", मग मला खालचे चिपळूणवाले आणि वरचे सिंधुदुर्गवाले पण लांबचे वाटणार... रत्नागिरी कोकणात म्हणून मग मी "कोकणी", मग मला कोकणातले सगळे आपले वाटणार आणि पुण्या पासून ते पार नागपूर पर्यंतचे सगळे परके वाटणार... मी त्यांना "घाटी" म्हणणार... कोकण महाराष्ट्रात म्हणून मी "महाराष्ट्रीयन", मग इतर सगळे म्हणजे भय्ये, गुजराती, बंगाली माझे दुश्मन..., आता मी राहतो डोंबिवलीत म्हणून मी "डोम्बिवलीकर", मग मी डबल फास्ट गाडीत चढल्यावर कल्याण वाल्यांचा आणि ठाणेवाल्यांचा राग करणार... त्यांना नडणार... मी बर्यापैकी सोसायटीत राहतो मग मी चाळीत-झोपडपट्टीत राहणार्याना नाक मुरडणार... मी मराठी लिहितो-वाचतो-बोलतो म्हणून मी "मराठी" व इतर भाषांचा द्वेष करणार..., मग कधी मला माझ्या निरर्थक "आडनावाचा" अभिमान वाटणार, आणि इतरांच्या आडनावाकडे संशयाने पाहणार... मग कधी मोठा राडा झाला कि मी "हिंदू" असतो, अगदी गर्व से कहो... मग वरचे सगळे माझे मित्र आणि फक्त "ते" माझे शत्रू..., मग कधीतरी, 15 August, 26 January दिवशी आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा सामना असला कि मग मात्र मी पक्का "भारतीय"... मेरा भारत महान... (पण मेंदू माझा लहान ).. इतर असेच अनेक लहान मोठे अभिमान आहेतच... जसे कि, आपापल्या पदव्यांचा अभिमान... पेशाचा अभिमान... पदांचा अभिमान... विचारवंत असल्याचा अभिमान... समाजवादी असल्याचा अभिमान... डावे असल्याचा अभिमान... उजवे असल्याचा अभिमान... धार्मिक असल्याचा अभिमान... सनातनी असल्याचा अभिमान... स्त्रीवादी असल्याचा अभिमान... कवी-लेखक-साहित्यिक असल्याचा अभिमान... मी ज्या पंथाचा साधक असतो त्या पंथाचा आणि माझ्या श्री सद्गुरूंचा अभिमान... हि यादी वाढतच जाईल... ह्याच अभिमानाच रुपांतर इगो मध्ये होउन तू-तू-मै-मै ला सुरुवात होते... ठिणगी पडते... भांडणं होतात... मारामाऱ्या होतात... दंगली होतात... खून-खराबे होतात... माणुसकीचा मुडदा पडतो... हेच तर होत आलय जगात... पहा इतिहास... अभिमान असावा, पण मग तो आपल्या सत्कृत्याचा असला तर हे जग किती सुंदर होईल... किंवा आपण "माणूस" असल्याचा अभिमान बाळगला तर हे जगण किती आनंदी होईल... एक खराखुरा माणूस... कोणताही खोटा मुखवटा न घालणारा... कोणताही भाषेचा, प्रांताचा, अस्मितेचा, जातीचा, धर्माचा अभिमान न बाळगणारा... प्रत्येक माणसाशी "माणुसकी"ने वागणारा फक्त माणूस... .......... आहे का हे शक्य...? प्रयत्न करून पहा. 🙏🙏🙏🙏🙏
N
Navya Bose
Social · Marathi · Social_Awareness
251 likes
82 shares