Back to feed
R
Riya Agarwal Social · Marathi · Social_Awareness

तीच चंद्रवेळा........ तीच चंद्रवेळा तीच रानभुल झाडावर चाफ्याच्या चुक चुकलेले फुल गंधीत स्पर्श हवेचा अन् गलबलते ती वाट हरणाच्या डोळ्या मधले दिसे दाटले भय दाट त्या गर्द वनाच्या दाटी शिळ घालतो रावा वक्षात कुणाच्या भिनतो काजळवेळी पावा परडीत असंख्य होतो कोलाहल तो कळ्यांचा झाडावर बावरलेल्या जाताना मोहरलेल्या

114 likes 77 shares
WhatsApp