Back to feed
I
Ishaan Joshi Social · Marathi · Social_Awareness

दिनांक : 09-04-2018 राशी भविष्य : *कुंभ* कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या - परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.

209 likes 79 shares
WhatsApp