Back to feed
S
Saanvi Bhat Social · Marathi · Social_Awareness

निघालो असा की जायचे कुठे विसरलो चालतांना सांगाल का कुणीतरी ....काय विसरलो जगतांना झाले असेच कितीदा मी उंबराच पुजत आलो दारात माझ्यासाठी..कुणी दिसले का रडतांना.. होती तीच फक्त माझी.. वाट पाहणारी दारात गेल्या पुसुन त्या वाटा माय तु सोडुन जातांना... आता शोधतो घराला ...रडक्या या महानगरात गावाच्या झोपडीत माणुस सापडायचा हसतांना.. जवळ येतात सारी ती मायाच फसवी होती गर्दीत हसणारे आपले झाले का चालतांना... फक्त धावलो पुढे पुढे ...कुणी भेटेल या आशेने थकलो तवा कळाले फसवा मृगजळ पकडतांना.. असाच दिवस जातो ..अन रात माजवते काहुर उजेड नाही मिळाला पणती ज्योतीत जळतांना..!

259 likes 64 shares
WhatsApp