Back to feed
S
Sai Gupta Social · Marathi · Social_Awareness

*नांदेड मध्ये जातीयवादाचा नंगानाच* *वर्तमानपत्रांची अस्पृश्यता आणि अॅट्रासिटी अॅक्टच्या कठोर अंमलबजावणीची गरज......* महाराष्ट्रभर अॅ्ट्रासिटीचा दुरुपयोग होत आहे म्हणून हेतुपुरस्पर समाजनमन कलुषित करण्याचा हिडिस प्रकार होत असताना नांदेड शहरापासून पूर्णा रोडवर १० कि. मी. अंतरावर असलेल्या थुगाव (लिंबगाव) येथे राजाराम विठ्ठल कंधारे वय ४८ वर्ष या (मातंग) दलित समाजातील कष्टकर्‍यास स्वत:ची शेती नव्हती ते उपजिविकेसाठी विठ्ठल माधवराव भोसले यांच्या शेतात "बटाऊ" पद्धतीने काम करीत होते. भोसलेंचे पूतणे कृष्णा भोसले वय २५ वर्ष ह्या आरोपीने मयताच्या मुलीवर वाईट नजर ठेवून होता आणि शेतमालक शेतीत चांगले पिकले असल्यामुळे मोबदला देण्यास तयार नव्हते. गत महिन्यापासून धमकावण्यास सुरवात झाली. ३ सप्टेंबर रोजी मयताचे कलामंदीर येथून अपहरण करून ४ सप्टेंबर रोजी सोनखेड येथील आंबेगाव येथे गळा दाबून खून करण्यात आला, त्यानंतर पेट्रोल टाकुन मृतदेह अर्ध जाळून विटंबीत करण्यात आला १३ सप्टेंबर रोजी मोबाइल लोकेशन वरुण आरोपींना पकडण्यात आले त्यातील दोघांनी गुन्हाची कबुली केली असून आरोपी कृष्णा नारायण भोसले-वय २५ वर्ष, व अन्य १ आरोपी अटक असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. थुगाव येथे काल मयताचा अंतिम संस्कार झाल्यावर दलित वस्तीत भीषण शांतता आहे... *फिर्यांदीच्या घरी कोणतेही पोलिस संरक्षण नाही तसेच समाजकल्याणच्या अनुदानाची दमडीही नाही. मयताचे कुटूंब गाव सोडून इतरत्र राहण्याच्या बेतात आहेत. एवढी भयावह स्थिती आहे.* ग्रामीण भागात एक सामान्य दलित माणूस आजही गावकुसाबाहेर अस्पृश्यतेचं जीणं जगत आहे. सामाजिक कार्यकर्ते मूग गिळून गप्प आहेत आणि पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत तर प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाकडे अस्पृश्यता दाखवीत पाठ फिरवली आहे.... अश्याप्रकारे लोकशाहीची क्रूर थठ्ठा चालू असताना *"कोपर्डीतील अन्याय हाच अन्याय" बाकी सगळं आलबेल !*अशी प्रसारमाध्यामांची मांडणी सुरू असताना अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग होतो असे म्हणणे असेल तर *अॅट्रॉसिटी शिथील झाल्यावर किती नंगानाच होईल* याचा विचार मनात येणंही धरकाप उडवणारा आहे......बाकी वाचकांनी ठरवावं....!

54 likes 52 shares
WhatsApp