नराधमानां जात धर्म नसतो " व कुठलाच धर्म कुठलीच जात बलात्कार करा असं सांगत नाही.... किंवा सांगणार नाही.... आजपर्यंत कित्येक बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत.या घटनांवरुन आजपर्यंत हेच लक्षात येते की या वासनांधांना वय, नाते, जात, धर्म यांच्याशी काहीच देणेघेणे नसते. त्यांना समोर फक्त नारीचा देह दिसतो. त्यामुळे स्त्रीजात या नराधमांमुळे शापित होत आहे. अक्षरश :या हैवानांना दोन -तीन वर्षांची कोवळी पोर दिसत नाही कि आपल्या मातेसमान वा बहीणीसमान स्त्री दिसत नाही. पशुही म्हणून घेण्यास ते लायक नाहीत. कारण जंगली पशुही मादीवर तीच्या सम्मतीशिवाय हक्क प्रस्थापित करीत नाहीत. विशेष कोणताही कायदा नसताना जंगलात अलिखित कायद्याचे पालन हे हिंस्र पशु करीत असतात. मात्र माणुस हा सामाजिक प्राणी असताना, कायद्याचे त्याला बंधन असताना अशी हीन कृत्य करतो , त्यावेळी तो पशुही म्हणून घेण्यास पात्र ठरत नाही. त्यामुळे ते हरामखोर नराधम नरभक्षक दलित असतील तर सर्व दलित बांधवानां दोषी धरने अयोग्य ठरेल .. " सोशल मिडियावरती मनुवादी पिलावळ जातीय तेढ निर्माण करण्यासाठी भडकाऊ पोष्ट जाणून बुजुन व्हायरल करत आहेत त्यापासुन सावध रहा ! हो निषेधच.... पण ती शाळकरी पोर मराठा होती अन ते नराधम दलित होते म्हणून "नाही"....तर ती पोर तिच्या घरच्यांचा काळजाचा अन तिच्या आईच्या आंगचा तूकड़ा होती म्हणून,अन या समाजातील काही अमानुष श्वानांनी तिची बलात्कार करून निर्घृण हत्या केली म्हणून....निषेध.... या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा घाट समोर येतोय, तर एक सुजाण नागरिक म्हणून मराठा तरुणाना एकच आवाहन,की निषेध करा पण ती पोर मराठा होती अन ते नराधम दलित होते म्हणून नको, तर माणुसकी म्हणून निषेध, राजकारणी गप्प बसलेत म्हणून निषेध, मीडिया मुग गिळून बसलिये म्हणून निषेध, अन जातिवाद पसरवंनार्यांचा देखील निषेध.... निषेध
R
Riya Singh
Social · Marathi · Social_Awareness
195 likes
46 shares