Back to feed
J
Jiya Chauhan Social · Marathi · Social_Awareness

निसर्गाचे पारडे कऴत नाही कसे कुठे कधी झुकत जाते कुणाच्या झोऴीत पाण्याचे खऴखऴते झरे तर ओटीत कुणाच्या धगधगीत अंगार ओतून जाते हे झरे ही कधीतरी आटणारच की हे अंगार ही कधी तरी शमणार च की एकाच नाण्याच्या दोन बाजू नकऴत कधी स्वतः च बदलतात हा छापा हा काटा कऴेपर्यंत च बघणा-याला पुरतं संभ्रमात टाकतात कसल नशीब कोणती नियती शेवटपर्यंत ठरतच नाही कधी कधी स्वकर्तुत्वाचे गोडवे गाणा-या भल्याभल्यांचे गाडे अशाश्वताच्या चिखलात अचानकच रूतून बसते तर कधी दुरून भासणारे भिरभिरीत मृगजऴ सुद्धा अविरत तरंगांचे वाहते चकचकीत सरोवर दिसते आपण मात्र या अशा संभ्रमात च कायम जगायचे असते कारण या निसर्ग नामक अवलियाचे शाश्वत रूप अजून तरी त्याच्याच गुलदस्त्यात कुठेतरी खोल दडलेले असते

162 likes 70 shares
WhatsApp