Back to feed
K
Kabir Bose Social · Marathi · Social_Awareness

प्रादेशिक घडामोडी:- --------------------------------------------------------- ११ ऑगस्ट २०१६ * डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कार विभागीय आयुक्‍त उमाकांत दांगट, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांना जाहीर झाला १२ * महाड दुर्घटना आणि नंदुरबार जिल्ह्यात असाच धोकादायक प्रकार घडल्याने एसटी महामंडळाने धोक्‍याच्या मार्गावरून रात्रीच्या एसटी फेऱ्या बंद करण्याचा आदेश * राज्यातील मराठी माध्यमेतर शाळांत शिक्षण घेत असलेल्या आठवी ते दहावीच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजना राबविण्यात येते १३ * उद्योगपती आणि भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी यांना महापालिकेचा पहिला "विरशैव लिंगायतरत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे १४ * राज्यातील नागरी लोकवस्तीची वाटचाल हागणदारीमुक्‍तीकडे सुरू असून, "स्वच्छ भारत अभियानां‘तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर राज्यात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्‍त होण्याचा प्रथम मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला १५ * राज्य पोलिस दलातील 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर करण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील 10 पोलिस, उल्लेखनीय सेवेसाठी तिघे, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक मिळविणाऱ्या 37 जणांचा यात समावेश आहे. १६ कुलाबामधील आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली १७ राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असून, त्या पोलिसांना मुंबई पोलिस ऍक्‍ट आणि सायबर ऍक्‍टमधील तरतुदींनुसार अधिकार देण्यात आले आहेत रेल्वेपाठोपाठ आता एसटीमध्ये "वाय-फाय" तंत्रज्ञानाचे युग अवतरले आहे. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील 50 बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय यंत्रणा बसवण्यात आली मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला असून, ही समिती या संदर्भात नियमावली तयार करेल. १८ सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिवर्धक लावण्यासाठी पोलिस परवानगी घ्यावीच लागेल. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणाचे कायदे आणि नियमही काटेकोरपणे पाळावे लागतील. संमती असली तरीही रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. ते वापरणे हा आमचा घटनात्मक धार्मिक हक्क आहे, असा दावा कोणताही धर्म करू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. २० सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेले सरकार राज्यातील मध्यम व मोठ्या अशा तब्बल दोन हजार 200 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे काम हाती घेणार ·भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार एम. एस. धोनीचा चरित्रपट "एम. एस. धोनी-अनटोल्ड स्टोरी"च्या मराठीतील प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने विरोध केला २१ मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 अंतर्गत नेमकी कार्यपद्धती (SOP) निश्‍चित करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती गठित करण्यात आली २२ न्यायालयीन खटल्यात साक्षीदाराने दिलेले लेखी साक्षीपत्र न्यायिक अधिकाऱ्यांसमोर दाखल करणे बंधनकारक आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला २३ संसदेत संमत झालेल्या संविधान (122 वी सुधारणा) विधेयकाच्या समर्थनासाठी अर्थात वस्तू आणि सेवाकर विधेयकाच्या मंजुरीसाठी (जीएसटी) राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . २४ गॅसधारकांना मिळणाऱ्या "पहल" योजनेच्या लाभार्थींसाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला २५ महाराष्ट्र-तेलंगण आंतरराज्य मंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीत तुमडीहेटी, मेडिगट्टा आणि चनाखा-कोर्टा या तीन बॅरेजचे काम सुरू करण्यासाठी दोन्ही राज्यांदरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या तिन्ही बॅरेजच्या कामांमुळे राज्यातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 30 हजार हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे आगामी काळात तीन महिने सातत्याने शिधावाटप दुकानांवरील धान्य न घेतल्यास शिधापत्रिका रद्द होणार आहे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या दहीहंडी उत्सवात दहीहंडीचा थर वीस फुटांच्या वर नेण्यात येऊ नये, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केला. २६ खलनायक, नायक व चरित्र अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी लिहिलेले आत्मचरित्र "ऍण्ड देन वन डे‘ मराठीत अनुवादित करण्यात आले आहे. "आणि मग एक दिवस‘ असे या पुस्तकाचे नाव असून सई परांजपे यांनी हा अनुवाद केला आहे. २७ राज्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये आधार कार्ड नोंदणी मोहीम हाती घेऊन पाच वर्षांखालील बालकांच्या नोंदणीचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले हाजी अली दर्ग्यातील मुख्य गाभाऱ्यात (मझार) महिलांना प्रवेश द्यावा, असा महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने दिला. आतापर्यंत येथे महिलांना असलेली बंदी हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे, हे ट्रस्टने सिद्ध केलेले नाही. त्याचप्रमाणे अशी बंदी ही भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वांविरोधात आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. २८ देशातील 26 कोटी अपंग जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने "सुगम्य भारत अभियान" सुरू केले २९ पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही प्राप्तीकर विवरण पत्राची व लेखा परीक्षण लेखाची प्रत सादर न केल्यामुळे आठ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 9 सप्टेंबर 2016 पर्यंत कागदपत्रे सादर न केल्यास या पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द केली जाणार आहे ३० मोठ्या प्रमाणातील उत्पादन झाल्यामुळे कांद्याच्या भावात घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल शंभर रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ३१ डान्स बारमध्ये बारबालांच्या अंगावर पैसे उडविणे हे सभ्यता व संस्कृतीविरोधात असून, त्याला परवानगी देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले 1 सप्टेंबर२०१६:- नोटीस बजावूनही विवरणपत्राच्या व लेखापरीक्षणाच्या प्रती सादर न केल्यामुळे आणखी 57 मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता 248 झाली ·केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या दहा हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत राज्यातल्या पाच शहरांचा समावेश झाला हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या दहा शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा (जि.कोल्हापूर), वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), पाचगणी (जि. सातारा) या पाच शहरांचा समावेश आहे. २ राज्य मार्गांवर शंभर किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि अन्य सुविधा असणारे "जनसुविधा केंद्र‘ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला यापुढे फर्लो किंवा पॅरोल मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला ३ राज्य सरकारने शासनाच्या सेवेतील 19 लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आणि 6.5 लाख सेवानिवृत्तांच्या वेतनात महागाई भत्ता म्हणून 6 टक्‍क्‍यांनी वाढ केली ४ सरकारी मालकीच्या मात्र कोणत्याही वापराविना पडून असलेल्या जमिनींचा लिलाव करून अथवा गहाण ठेवून पायाभूत विकासकामासाठी निधी उभा करण्याचे सरकारने ठरवले ५ केवळ पाच शहरांमध्ये ई-रिक्षांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देणाऱ्या राज्य सरकारने आता मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात या रिक्षांना परवानगी दिली ६ महाड - पोलादपूर रस्त्यावर सावित्री नदीवरील खारपाडा पूल कोसळण्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूल निरीक्षणामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेत केंद्र व राज्य शासनास नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. ७ मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने आता महामार्गांवरील हवामानाकडे मोर्चा वळवला आहे. राज्यातील 18 महामार्गांवरच्या हवामानाची माहिती हवामान विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे ८ पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाणे गेल्या पंधरा वर्षांपासून वाढले आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांवरील हल्ला हा संपूर्ण दलावरील हल्ला समजण्यात येईल. तसेच, मुख्य न्यायाधीशांना भेटून पोलिसांवरील हल्ल्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्याची सूचना करणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत सरकारची भूमिका मांडली ९ बार्शी येथे राज्य मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे १० मिहान प्रकल्पातील पतंजली फूड अँड हर्बल पार्क 230 एकरांत उभारण्यात येणार आहे. त्यात 1600 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे

126 likes 37 shares
WhatsApp