Back to feed
S
Shaurya Malhotra Social · Marathi · Social_Awareness

पोस्टी (posts):- " काहींच्या पोस्टीची आतुरतेनं वाट बघितली जाते तर काहींच्या पोस्टीकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते.करावे वाटते.काहींच्या पोस्टी विचारप्रव्रुत करतात तर काहींच्या विचार खुंटवतात.काहींच्या गहन असतात तर काहींच्या उथळ,काहींच्या लांबलचक असूनही ज्यांचा आखूडही आशयही नसतो तर काहींच्या कमी शब्दात असूनही जास्त आशयघन असतात . काहींच्या गारवा देतात.आल्हाददायक असतात.तर काहींच्या कडक उन्हासारख्या भाजून काढतात.काहींच्या संभ्रम मिटविणा-या तर काहींच्या गोंधळ वाढविणा-या,काहींच्या अंधारात प्रकाश दाखविणा-या तर काहींच्या प्रकाशात अंधार वाटायला लावणा-या ,काहींच्या गुंते सोडविणा-या तर काहींच्या गुंते वाढविणा-या,काहींच्या गूढ तर काहींच्या सरळ,सुटसुटीत .........,......,..... एकंदरीत काय, तर काही पोस्टी सकारात्मक तर काही नकारात्मक असतात.मग ज्याचं त्यानं ठरवायचं की त्यातुन काय घ्यायचं.फुलातसुध्दा काटे आहेत म्हणत रडायचं की काट्यातसुध्दा फुले आहेत म्हणून हसायचं..! - पोस्टतज्ज्ञ स.दा.समीक्षेकर😎 " पोस्टींवर अंधुक बँटरीचा प्रकाश टाकताना..." या आगामी समीक्षापर ग्रंथातून....

182 likes 60 shares
WhatsApp