मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय? १० रूपयाला वडापाव आणी ८ रूपयाला चाय. आला पाहुणा घरी तर आखडून बसायच पाय. आणायची १०० रु. किलोचे चिकन नी सांगायचे ... बोकडाच मिळतचं नाय. अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय. मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय? सकाळी सकाळी 7:30 वाजता उठायच. बिना तोंड धुता खिडकित यायच. शेजारच्या पोरीला collegeला जाताना हळूच म्हणायच, हाय. तीने रागात पाहिलं तर, म्हणायच सुंदर माझी ताय.. मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच.. राँग नंबर लागला की काय? अहो मुंबई मुंबई मुंबई तिथं आहे तरी काय?? रिक्षाची भीड, गल्ली बोलातले रस्ते बाइक वाल्यांची किर किर, फेरीवाल्यांची दादागिरी, सडलेली कोथींबीर, कच्चा कुच्चा वडापाव, आणि पानी पुरी खाऊन पर प्रांतीयांनाच म्हणायचे भाय. अहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय?? पाण्यासाठी पळायच, गॅससाठी रांगा कामाला जाण्या अगोदरच फैक्ट्रीचा वाजतो भोंगा. धावत धावत टाकाव्या लागतात ट्रेन मधे ढेंगा. ट्रेन मधल्या गर्दीत आपण असतो आतमध्ये आणि बाहेरच लटकतात पाय.. दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय?? काही ही असुद्यात पण करोडो कुटुंबाची पोशिंदा ती तीच आमची ताय आणि तीच आमची माय.. आमच्या मुंबईचा आम्हाला अभिमान हाय आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय गरिबाच पोट आणि दुधावरली साय....😄😊😊
V
Vihaan Kapoor
Social · Marathi · Social_Awareness
158 likes
84 shares