महत्त्वाची नोंद: अलीकडे अत्यंत लहान मुलींवर अत्याचार होत आहेत.यामागे जी अनेक कारणे आहेत,त्यातले महत्त्वाचे कारण लैंगिक शिक्षणाचा अभाव हे आहे.मोबाईलमुळे सगळे जग मुठीत आले म्हणताना लैंगिक विकृतीपण मुठीत आली.याबद्दल आपण गंभीर विचार करायला हवा.बाहेर राहू द्या.घरात तरी त्यावर मुलांशी बोला. घरात आम्ही "थ्री एडिटस्"बघत होतो.गँदरिंगच्या भाषणातील स्थान ऐवजी "स्तन " हा शब्द ऐकून अख्खं सभागृह हसू लागल्यावर आमच्या मुलाने "स्तन म्हणजे काय?" असं विचारल्यावर त्याची आई , " तुला काय करायच्यात अशा चौकशा?गप्प बस".असं म्हणाली. मग ती उठून गेल्यावर त्याला "स्तन म्हणजे लहानपणी तुला दात नसताना आईने जे दूध पाजलं,ते दूध साठवण्याची आईच्या छातीची उंचवट्यांची जागा आहे.त्यावर तो म्हणाला," यात हसण्यासारखं कायाय मग? मी समजावलं,"मूळ शब्द नीट न उच्चारल्यामुळे हसले सगळे." तर तो मजेत पुढे सिनेमा पाहू लागला.नंतर मी माझ्या बायकोला समजून सांगितले. नंतर एकदा दोघं भावंडं खेळत असताना त्यांचे एकमेकांचे ओठ एकमेकांना लागल्यावर ते हसायला लागले.तसं मी म्हणालो,"पायाला पाय,हाताला हात लागल्यावर हसत नाही,आता का हसता?सिनेमा फार गंभीरपणे घ्यायचा नसतो. मुद्दा हा की,लैंगिक शिक्षणाचा मोकळेपणा घरातऐ सुरु व्हायला हवा. बाहेरचं औपचारिक शिक्षण नंतर बघू. आणखी एक,पुरूष -स्त्री संबंधाकडे जात,धर्म,मालक,फसवणूक,बदला, उपभोग या अंगाने न पाहता एकतर त्यतील निखळपणा आणि विकृतीकरण याच अंगाने पहावे.कुणी कुणाला कुठं बोलावलं असलं आजच्या काळात बोलून भडकणं-भडकवण्यात अजिबात अर्थ नाही.अशामुळे आपण अधिक पाशवी बनत आहोत.
A
Arjun Bhat
Social · Marathi · Social_Awareness
195 likes
33 shares