Back to feed
N
Navya Gupta Social · Marathi · Social_Awareness

महात्मा बसवेश्वर महात्मा कसे झाले त्यांनी उभ्या आयुष्यात कधी मुंगीवर देखील पाय ठेवला नाही.कल्याणच्या हरळय्याने आपले स्वतःचे आणि पत्नीचे मांडीचे चामडे काढून चप्पल बनवीले व बसवांना ती चप्पल भेट दीली त्यांची भक्ती पाहून हळव्या बसवांच्या डोळ्यात पाणी तरळले ती चप्पल म्हणजे बसवांप्रती हरळय्याची भक्ती होती.१२ व्या शतकात बसव मंटपात स्त्रीयांना बरोबरीचे स्थान दिले.कर्मकांडाला फाटा देत निर्गुण निराकाराची लिंगपुजा शिकवली.जीव हाच शिव आहे.याची शिकवण रुजवली जातीभेद नष् ट करण्याचा प्रयत्न केला.महार, मांग, ढोर,चांभार,कक्कय्या,बुरुड अशा अनेक जीवाना लिंगदीक्षा देऊन सामावून घेतले.ज्यांच्या संपर्कात राहून अक्कमहादेवी , धानम्माताई,हरळय्या असे अनेक संत होवून गेले.अशा महान विभूतीने रचलेल्या लिंगायत धर्मात आपला जन्म झाला याचा अभिमान बाळगुन त्यांची शिकवण अंगाअंगात,रगारगात भिनवा.तुमच्या वागण्याने लोकांनी ओळखले पाहीजे हा बसवाचा शरण आहे .धन्यवाद

146 likes 22 shares
WhatsApp