Back to feed
A
Anaya Agarwal Social · Marathi · Social_Awareness

महान्यूज तरुणांनो, उद्योजक व्हा ! सोमवार, २५ जुलै, २०१६ पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी देशात ""मेक इन इंडिया"" तर मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ""मेक इन महाराष्ट्र"" हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. देशांतर्गत गुंतवणूक वाढावी, मोठ्या प्रमाणात उद्योग विकास व्हावा, रोजगाराची निर्मिती व्हावी आणि देश एक सशक्त आर्थिक राष्ट्र म्हणून उभे राहावे हा या अभियानाचा हेतू आहे. तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे, यासाठी शासनाच्या काही योजना आहेत. या योजनांची माहिती आपण करुन घेणार आहोत. आज आपण जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेची माहिती घेऊ या. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सेवा उद्योगासाठी रु. 10 लाखांपर्यंत, उद्योग क्षेत्राकरीता रु. 25 लाखांपर्यंत रक्कम उपलब्ध करुन देण्यात येते. विशेष म्हणजे या योजनेत एकट्या ऐवजी दोन किंवा जास्तीत जास्त पाच लाभार्थींना भागीदारीमध्ये उद्योग/व्यवसाय सुरु करता येतो. या योजनेअंतर्गत प्रकल्प मंजूर रकमेच्या वर्गवारीनुसार 15 ते 20 टक्के पर्यंत अनुदान मिळते. बँकेच्या कर्जावर प्रचलित दराने व्याज आकारणी व परतफेड करण्याचा कालावधी 3 ते 7 वर्षे आहे. उमेदवाराने प्रकल्प किंमतीच्या किमान 5 टक्के ते 10 टक्के स्वत:ची गुंतवणूक करावयाची असते. उर्वरित रक्कम राष्ट्रीकृत बँकाकडून कर्ज स्वरुपात अर्जदार उमेदवारास मिळते. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्जदार विहीत नमुन्यामध्ये अर्ज सादर करतात. अर्जदार योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असल्यास सदर अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या कार्यपथक समितीपुढे अर्ज सादर करण्यात येतो. कार्यपथक समितीमध्ये अर्जाची छाननी झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अर्ज बँकेकडे शिफारस करण्यात येतो. बँकेकडून कर्ज मंजूरी मिळाल्यानंतर अशासकीय संस्थेकडून अर्जदारास त्याच्या प्रकल्पाबाबत माहिती व प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेकडून कर्ज वितरीत करण्यात येते. कर्ज वितरीत करत असताना बँकेकडून लाभार्थ्यांच्या खाती योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान मार्जिन मनीच्या स्वरुपात जमा करण्यात येते. हे अनुदान लाभार्थ्यांच्या कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत बँकेत जमा ठेवण्यात येते. या योजनेसाठी अर्जदार कमीत कमी 8वी पास अथवा आयटीआय पास अथवा सरकार मान्य संस्थेतून तांत्रिक स्वरुपाचा कमीत कमी सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केलेला असावा. त्याचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. ज्या जिल्ह्यात व्यवसाय करावयाचा आहे तेथील त्याचे कमीत कमी वास्तव्य 03 वर्षे इतके असावे. तथापि विवाहीत महिलांसाठी वास्तव्याची अट शिथिलक्षम आहे. तसेच अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा व इतर सरकारी योजनांचा लाभार्थी नसावा. उमेदवारांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. पंतप्रधान रोजगार योजनेतंर्गत करता येणाऱ्या उद्योगांची यादी पुढीलप्रमाणे आहे : 1) सेवा उद्योग - (1) रसपानगृह (2) हॉटेल (3) एक्सप्रेसो कॉफी (4) फिरते रेस्टॉरंट (5) हेअर ड्रेसिंग सलून (6) ब्युटी पार्लर (7) टाईपरायटिंग मशीन (8) टाईपिंग इन्स्टिट्यूट (9) टेलरिंग इन्स्टिट्यूट (10) गवंडी काम (11) कोचिंग क्लास (12) फिरते वाचनालय (13) घड्याळे दुरुस्ती (14) इंजिन व पंप दुरुस्ती (15) रेडिओ टेपरेकॉर्डर दुरुस्ती (16) इलेक्ट्रिक मोटार रिवायंडिग (17) भांड्यांना कल्हई करणे (18) फोटो फ्रेम करणे (19) स्टोव्ह, इस्त्री, पेट्रोमॅक्स-कुलुपे-छत्र्या दुरुस्ती (20) मोटार गाड्या, स्कूटर्स दुरुस्ती (21) शेतीची अवजारे दुरुस्ती (22) जाहिरात संस्थेसाठी फिल्म काढणे (23) यंत्रसामुग्री दुरुस्ती (24) फोटो (स्टुडिओ आत व बाहेर) (25) ऑटो रिक्षा (26) टुरिंग टॉकीज (27) गाद्या, उशासाठी कापूस पिंजणे (28) लाऊडस्पीकर, मंडप, लाईट (29) भिंतीवरील पोस्टर्स, चित्रे रंगविणे (30) आईस्क्रीम व थंडपेय विक्री (31) घरगुती व औद्योगिक वस्तूंसाठी पॅकिंग मटेरिअल (32) ड्रायक्लिनिंग (33) रेफ्रिजरेटर (34) एअर वॉटर कुलर दुरुस्ती (35) प्रोजेक्टर व इतर उपकरणांची दुरुस्ती (36) गॅस बर्नर, बादल्या, भित्तीपत्रक, घड्याळे, शिवणयंत्रे, कॅमेरे दुरुस्ती (37) कॅल्क्युलेटर्स, टाईपरायटर्स, फाऊटन पेन दुरुस्ती (38) सुटकेस व सिगारेट केस दुरुस्ती. 2) व्यापार उद्योग – (1) पुस्तकांचे दुकान (2) गोळ्या बिस्किटांचे दुकान (3) कापड व्यापार (4) कटलरी व्यवसाय (5) फळ विक्री (6) खते बी-बियाणे विक्री (7) रॉकेल विक्री (8) पोल्ट्री, डेअरी व्यवसाय (9) स्टेशनरी विक्री (10) फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर (11) बांगडी दुकान (12) फुले, हार गजरे विक्री (13) भाजीपाला विक्री (14) मसाला, पापड, लोणचे विक्री (15) वर्तमानपत्रे, मासिके विक्री (16) रेशन दुकान (17) तयार पादत्राणे विक्री (18) होजिअरी व तयार कपडे विकणे (19) स्टॅम्प विक्री (20) मेवामिठाई विक्री (21) रद्दी भंगार विक्री (22) मांस व मासे विक्री (23) पी. व्ही. सी. पादत्राणे विक्री (24) कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय (25) पुस्तक प्रकाशन (26) लॉटरी तिकीटे विक्री (27) फर्निचर (लाकडी, लोखंडी) विक्री. 3) लघु उद्योग – (1) खादी (सुती, रेशमी, वुलन), (2) गुळ व खांडसरी (3) खाद्यतेल व साबण उद्योग (4) चर्मोद्योग (5) कुंभार काम (6) विटा तयार करणे (7) मातीची भांडी व मातीचे पाईप (8) अगरबत्ती (9) मंजन तयार करणे (10) कडबा कुट्टी (11) सुटकेस (12) प्लास्टिक वस्तू (पेन, रिफील, खेळणी इ.), (13) रेक्झिन बॅग (14) लेदर बेल्टस् (15) पॅकिंग केसेस (16) लाकडी खेळणी तयार करणे (17) होजिअरी (18) ट्युब व्हल्कनायझिंग (19) ग्रामीण तेल (बैल घाणा), (20) फळ प्रक्रिया (लोणची, आवळा सुपारी), (21) धान्या, डाळी प्रक्रिया (बेकरी, पापड, शेवई, लाह्या व पोहे), (22) दोरखंड तयार करणे (23) बांबूपासून आकर्षक वस्तू बनविणे (24) खडू बनविणे (25) पावडर (फेस), (26) मिरची पावडर (27) टिनस्मिथ – चाळण्या, नरसाळे, पोहरे, घागरी, तवे, मीटर वॉशेस, मोटारीची झाकणे, बादली, टोपले, तेलाचा पंप इ. (28) फुलबॉल वॉशर्स (29) बैलगाड्या (वॅटसन, राउंड, ब्लॉक स्क्वेअर), (30) बॅटन्स, राऊंड इलेक्ट्रिककरिता (31) अडकित्ते, चाकू सुऱ्या, विक्री (32) आरसे उत्पादन (33) बैलाच्या गळ्यातील घंटा व घुंगरु बनविणे (34) कागदी पाकिटे तयार करणे (35) खाण्याचा चुना (36) वॉल हॅगिंग्ज (37) प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या शोभेच्या वस्तु, गणपती, लक्ष्मी (38) कुलूपे तयार करणे (39) कागदी फाईल्स (40) भांडी धुण्याची पावडर (41) गाद्या तयार करणे (42) सुवासिक सुपारी (43) वर्कशॉप (44) कातडी कमावणे (45) छापखाना (46) लाकडी खेळणी तयार करणे (47) टोपल्या विकणे (48) गोळ्या तयार करणे (49) राईस मिल (50) स्टील फर्निचर (51) पितळी भांडी (52) छत्र्या ॲसेब्लिग (53) सायकल सीटस् तयार करणे (54) कुंकू तयार करणे (55) पायमोजे तयार करणे (56) स्टोव्ह विक्स (57) फाईल टॅग (58) वुलन कार्पेटस् (59) काऊंड्री (60) ब्लँकेट तयार करणे (61) एम्ब्रॉयडरी (62) शेती अवजारे (63) वायुर्वेदिक औषधे (64) शू-लेसेस (65) पेपर बॅग (66) ऑफिस फाईल (67) कार्ड बोर्ड बॉक्सेस (68) स्क्रीन प्रिंटीग (69) सर्जिकल बॅडेज (70) गोप दोरी (71) पेन शाई (72) बॉलपेन रिफिल (73) बॉलपेन (74) रबर स्टॅम्प (75) बटाटा वेफर्स (76) पॉपकॉर्न (77) बॅक्रोनी (78) बुक बायंडिग (79) सायक्लोस्टायलिंग (80) वह्या तयार करणे (81) राईस प्लोअर मिल (82) फिनाईल (83) डिओडरंट (84) प्लास्टिक बटन्स (85) रिळे दोरे (86) दंत मंजन काळे (87) चाप कटर (88) क्रेन (89) चुना तयार करणे (90) डिस्टिल्ड वॉटर (91) सोडा लेमन, थंड पेये (92) हळद पावडर (93) रॉकेल पंप्स (94) प्लास्टिक बुक कव्हर्स, पाकिटे (95) चिकट गम (डिंक), (96) लाख (97) बेकरी (98) मसाला (99) पोहा (100) रसवंतिगृह (101) बंद पाकिटातून फराळाचे जिन्नस पॅक्ड लंच (102) तळलेले पदार्थ (103) वेफर्स (104) खांडसरी, खडीसाखर (105) फ्रुट ज्यूस स्टॉल (106) गोठवलेल्या खारवलेल्या पदार्थांचे स्टॉल (चिकन, बोंबील, सोडे इ.) (107) आईस्क्रीम पार्लर (108) शेवई (109) शेंगा फोडण्याचे यंत्र (110) गोळ्या, चॉकलेट इ. (111) चिक्की (112) मत्स्य उत्पादन (113) द्रवरुप साबण (114) बूट पॉलिश (115) कापूर (116) भट्टी साबण (117) रोशा मास ऑईल (118) केशतेल (119) प्लॅस्टिक वस्तू (120) प्लॅस्टिक वेल्डिंग (121) स्टॅम्प इंक (122) बांधकामाचा चुना (123) काँक्रिट जाळी कुंडी (124) चिनी मातीची भांडी (125) मातीच्या शोभिवंत वस्तू, मूर्तीकाम (126) मोझॅक टाइल्स (127) पॉलीश्ड स्टोन (128) तेल पॉलिश (129) चष्माच्या काचा (130) छोटे ट्रान्सफॉमर्स (131) ॲन्टी कारट्रीज फ्यूज (132) फ्लोरोसंट ट्यूब लॅम्पच्या स्टार्टची जुळवण (133) वायरिंग करणे (134) वायरिंगसाठी लागणाऱ्या सिंग लिप्स (135) बॅटरी चार्जिंग रिकडिंशनिंग (136) डिजीटल क्लॉकची जुळणी (137) ऑडिओ कॅसेट ॲसेम्बी (138) इलेक्ट्रॉनिक गॅस लायटर (139) डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक टायमर (140) इमर्जन्सी डोअर बेल (141) टी. व्ही. अँटेना (142) टी. व्ही. दुरुस्ती (143) इंटरकॉम सिस्टिम (144) ट्युब लाईट चोक (145) सार्फक्ट सोल्डर (146) फॅन रेग्युलेटर्स, लाईट डिमर्स (147) सॉफ्ट लाईट चोक (148) सॉक्स (मोजे) (149) पेटिकोटस् (150) नेटेड लेदर बेल्टस (151) हॅण्डबॅग्ज (152) फोम लेदर पाऊचेस (153) कॉमन ट्रेड टाईप चप्पल (154) शूज, लेडीज सॅण्डल्स (155) सायकल स्टॅण्ड, करिअर (156) वस्त्रोद्योगासाठी लागणारे पप्रस कॉपोनंटस् (157) ऑटो सायलेन्सर (158) शेतीची अवजारे (159) लॅमिनेशन (160) उपकंत्राटी व्यवसाय (161) जाहिरात व्यवसाय (162) कम्युनिकेशन सर्व्हिस (163) लगेज कॅरिअर्स, स्कूटर बास्केट (164) ऑटो गॅरेज सर्व्हिंसिंग (165) मार्केट इन्फर्मेशन सर्व्हिस (166) क्लिनिकल लॅब (167) पाळणाघर (168) टाईपरायटिंग इन्सिटट्युट (169) बुक लेडिंग लायब्ररी (170) रंगकामात, उद्योगात व स्वच्छतागृहात लागणारे ब्रश (171) इंडस्ट्रियल ग्लोव्हज (172) पर्स व की चेन्स (173) सॅनिटरी नॅपकिन्स. राज्यातील तरुणांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन उद्योजकतेची कास धरावी आणि या योजनेचा मूळ हेतू सफल करावा. - देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती)(प्रशासन) "महान्यूज" (www.mahanews.gov.in) मधील मजकूर आपण "महान्यूज"च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

159 likes 30 shares
WhatsApp