"विधवेचे जगणं"😔 तिचा नवरा मेला आणि.. तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. आणि ती विधवा झाली. किन..किन वाजणारी तिच्या हातातली काकणं क्षणार्धात स्मशाणात फुटली गेली. धडाधड जळणाऱ्या नवऱ्याच्या प्रेताकड बघत... तीही आतून जळत होती. विधवेचं कपाळ सकाळी सकाळी कोणी बघत नाहीत.. असा गावातला नियम सांगतो. पण त्याच विधवेला अंगाखाली घेताना.... तो समाज का लाजत नाही? विधवा बाई म्हणजे गाव जेवण असतं का? ती रस्त्याने निघाली कि तिच्या देहाकडे बघून कित्येक जण... नजरेचा बलात्कार करून घेतात. कधी कधी घरातलाच नालायक शोषण करतो. ती रस्त्याने निघाली कि म्हटलं जातं. अरे काय माल आहे रे हि... तिचे उरोज बघ..... किती सुटली आहे रे हि नवरा मेल्यापासून.... आणि लाळघोट पणे हसायला लागतात लोकं. अरे थू तुमच्या संस्कारावर. थू तुमच्या जिंदगीवर. अरे... ती सहन करते तूमचा मानसिक अत्याचार. तिचं मोल नसतं ना विधवा झाल्यावर. कारण ती बाई असते. तुमची स्वतःची प्रॉपर्टी असल्यागत वागता तुम्ही नालायकांनो. घुसमटून जगत असते ती. भयानकतेच्या सावटाखाली. एखादा बदमाश येतो... रेट विचारतो. काळजात धस्स होतं तिच्या. आपल्या लहानग्या पिल्लांना बिलगून ती रडायला लागते. लोकहो... इतका अत्याचार बरा नाही. हाच प्रसंग तुमच्या आई,बहिणीवर आला तर??? ? ? ? सुन्न वाटतंय ना? मग दुसऱ्याच्या आई बहिणीला का बदनाम करताय? असाल चांगली माणसं तर... तिला सन्मानानं जगायला शिकवा. तिच्या हाताला काम द्या. इज्जत द्या. माणुसकीनं बोला तिच्याशी. मग बघा... तिच्या डोळ्यातले अश्रू तुमचे पाय सतत भिजवत राहतील. हे शपथेवर सांगतोय. ✍✍ दत्तकवी
M
Myra Kumar
Social · Marathi · Social_Awareness
28 likes
85 shares