व्हीस्की आणि रम यातुनी कोण आवडे अधिक तुला ?|| सांग मला रे सांग मला !! व्हीस्की दिसते गोजिरवाणी थोडा सोडा थोडे पाणी ! बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला ! व्हीस्की आवडे अधिक मला !! गोजिरवाणी दिसते व्हीस्की परंतु असते भलती रिस्की ! सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला ! आवडते रे रम मला !! काळी, सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम ! कोल्यामध्ये मिसळूनी घेता, कळे न काही कोणाला ! रम आवडे अधिक मला !! थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम ! व्हीस्की पिता विमान उडते, सुसाट जाई आभाळा ! व्हीस्की आवडे अधिक मला !! व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते ! व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला ! व्हीस्की आवडे अधिक मला !! "तशी"च घेता रात्री भाई, थंडी वारा लागत नाही ! पुण्य लाभते पाप्याला ! रम आवडे अधिक मला !! नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की ! थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला ! बियर बरी रे तब्येतीला !!!! 🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻
K
Kavya Bagale
Social · Marathi · Social_Awareness
39 likes
78 shares