सभ्य स्त्री,पुरुष आणि अन्यहो, कोल्हापूरातील प्रसंग...कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी भोंदूबाबाची भूमिका करणार होतो.. ड्रेपरी आवश्यक होती. ड्रेपरी मिळते त्या दुकानात गेलो पण दुकानमालक बाहेर गावी गेलेले. त्यांची ऐन पंचविसीतली बायको एकटीच घरी.. मी म्हणालो मला भोंदूबुवाचा पोशाख हवाय. त्यांनी माझ्याकडे न पाहताच पिशवी हवाली केली. पोशाख मी बाहेर काढला.. दाढी मिशा कशा बसवायच्या याची ट्रायल तिथेच घ्यावी म्हटलं..दाढी वाकडी का असेना बसली पण किती प्रयत्न केला तरी मिशा बसता बसेना...त्यांना विचारलं हे कसं तर माझ्याकडे न बघताच त्या म्हणाल्या ती छोटी तार वाकडी करा..तेबी करुन बघीतलं पण बेटी बसायला तयारच होईना..त्यांना पुन्हा विचारलं तरी त्या अवघडल्यासारख्या तशाच खाली बघत बोलल्या.ट्राय करा बसेल...पुन्हा प्रयत्न तर मिशी निसटून त्यांच्या समोरच पडली.त्या गालात हसल्याचा मला भास झाला...पण माझ्याकडे नजर वरती करुनही त्या पाहिनात की मी बोलल्याशिवाय काही बोलेनात...प्रश्न पडला काय करावं कॉय करावं ? डोकं चालवलं..चेहरा होता होईल तेवढा निरागस करायचा प्रयत्न केला..साजूक चेहऱ्याने आवाजात ओलावा आणत म्हणालो, "ताई....सांगा ना व्यवस्थीत कशी बसवायची ही मिशी ? थोड्याच वेळात कार्यक्रम आहे..." त्यांनी आता नजर वर करुन माझ्याकडे पाहिले."ताई"शब्दाची जादू इतकी की माझ्या हातातली मिशी घेऊन तार अॅडजस्ट केली आणि मिशी माझ्या ओठावर बसवली...मित्रा माझ्या मराठी शब्दांना फक्त अर्थ नाहीत तर प्रत्येक शब्दासोबत एक भावना जोडली गेलीय...एक काळजाला साद घालणारी किनार आहे त्या शब्दाच्या मुळाशी.. म्हणून श्रेष्ठ आहे माझी माय मराठी !! *मराठीभाषादिनाच्याआजचशुभेच्छा*
V
Vanya Mishra
Social · Marathi · Social_Awareness
12 likes
2 shares