Back to feed
A
Atharv Mishra Social · Marathi · Social_Awareness

सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे 🔴 👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी 👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे. 👉३. वैद्यकिय दाखल्याची नोंद. 👉४. जात पडताळणी बाबतची नोंद. 👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद. 👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद. 👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद. 👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद. 👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार ) 👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद. 👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद. 👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद. 👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद. 👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी. 👉१५. नाव बदलाची नोंद. 👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद. 👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद. 👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद. 👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद. 👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद. 👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद. 👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी. 👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद. 👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद. 👉२५. रजा प्रवास सवलत नोंद. 👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद. 👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी. 👉२८. सेवा पडताळणीची नोंद. 👉२९. जनगणना रजा नोंद. 👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी. ३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद.

42 likes 15 shares
WhatsApp