( हा लेख स्वतःची सद्सदविवेक बुध्दी वापरणार्या व मानसिक दृष्ट्या मजबूत असणार्या तसेच ह्रदय विकार नसणार्या व्यक्तिंसाठी असुन धार्मीक, देव मानणारे व ह्रदय विकार असणार्या व्यक्तिंनी हा लेख वाचु नये. ) मित्रांनो, आज पासुन दिवाळी सुरु होत आहे. बहुजनांचा हा संपुर्ण वर्षातील सर्वात मोठा सन. दिवाळीच्या आपणा सर्वांना मनपुर्वक शुभेच्छा......!!!!!! भारतातील विषेशतः महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज हा सन उत्साहात साजरा करतात. या सनाच्या निमित्ताने आम्ही आमच्यासाठी ज्या आमच्या पुर्वजांनी चांगले काही करुन गेले त्यांचे स्मरण करत असतो. बहुजनांच्या या सनाची वास्तववादी माहीती आपल्या साठी थोडक्यात देत आहे. १. वसुबारसः दिवाळीचा पहिला दिवस. वसु हा कश्यप व कद्रु या दोघांचा पुत्र. जो पुढे शुर नाग वंशीय राजा म्हणुन उदयास आला. ज्याने ब्रम्हदेवा सोबत युध्द करुन बहुजनांचे संरक्षण केले होते. त्याला वासुकी म्हणुनही ओळखले जाते. त्याचे पुजन आणी स्मरण ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी करतो. २. धन त्रयोदशीः दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी " यमपुजन " केले जाते. यम हा बहुजनांचा राजा. ज्याने कधीच कोणत्याही युध्दात हार पत्करली नाही. शत्रुवर त्याने हल्ला केला की शत्रुचा अंत ठरलेला असायचा. म्हणून त्याला मृत्युदेवता म्हणून ओळखले जावू लागले. पण ही त्याची ओळख त्याचे कर्तुत्व झाकण्यासाठीच तयार करण्यात आल्याचे निदर्शनास येते. बहुजनांच्या या शुर राजाचे स्मरण धनत्रयोदशीला केले जाते. पुर्वी हा दिवस यमपुजन म्हणुनच साजरा केला जायचा. ४. नरक चतुर्थीः या दिवशी नरकासुराचे स्मरण व पुजन केले जाते. बहुजन संस्कृतीचा हा दुसरा शुर व प्रचंड नैतिकता असणारा राजा. कोणत्याही स्त्रीवर हत्यार न चालवणे ही बहुजनांची संस्कृती. कृष्णाने याच नैतिकतेचा फायदा घेवून नरकासुराला कपटाने मारले. युध्दात त्याने आपल्या रथाचे सारथ्य सत्यभामेला करायला सांगुन एका स्त्रीच्या पाठीमागे लपुन त्याने आपला जिव वाचवला. नरकासुर कृष्णाला सहज मारु शकत असतानाही तो हत्यार खाली ठेवतो. नरकासुराला दुर्योधन सांगत असतो की तु हत्यार खाली ठेवू नकोस नाहीतर कृष्ण तुला मारेल. त्यावेळी नरकासुराच्या नैतिकतेचा प्रत्यय आपणास अनुभवयास मिळतो. दुर्योधनाला तो उत्तर देतो की जर मी हत्यार चालवले तर आधी सत्यभामा मरेल आणी नंतर कृष्ण. स्री हत्येचे पातक डोक्यावर घेण्या पेक्षा मी मरण पत्करेल. याच संधीचा फायदा घेवून कृष्ण सत्यभामेला नरकासुरावर हत्यार चालवायला सांगतो आणी स्वतः तिच्या पाठीमागे लपुन स्वतः सुदर्शन चक्र चालवतो. नरकासुराच्या या शुरतेला व नैतीकतेला सलाम करण्यासाठी आम्ही नरक चतुर्थीला त्याचे पुजन करतो. ५. कुबेर पुजनः कुबेर हा रावणाचा भाऊ. बहुजनांचा राजा ज्याने त्याच्या राज्यात प्रचंड आर्थीक सुबत्तता आणली होती. ही सुबत्तता एवढी अमाप होती की राज्यातील प्रत्येक घराला सोन्याचा मुलामा होता. एक हुशार अर्थतद्न्य, विकासक, कृषी व अभियंता क्षेत्रातील तद्न्य म्हणुन आज ही त्याची ख्याती आहे. बहुजनांच्या या गुणी राजाचे या दिवशी पुजन केले जाते. ६. बलिप्रतिपदाः या दिवशी बहुजनांना आजही ज्याचा अभिमान आहे आणी त्याच्या नावानेच आम्ही आमची ओळख करवून देतो त्या " बळी राजा " चे पुजन व स्मरण आम्ही करतो. कृषी क्षेत्रात प्रचंड विकास करणारा हा राजा. त्याच्या राज्यातील सुबत्तता पाहुन बामनाने त्याला कपटाने मारले. तरीही त्याने स्वतःची नैतिकता सोडली नव्हती. आमच्या या शुर व नैतिक राजाचे पुजन व स्मरण आम्ही बलिप्रतिपदेला करतो. ७. भाऊबिजः या दिवशी यम व यमुना या दोघांचे पुजन व स्मरण केले जाते. बहुजन संस्कृती विकासात यमाची बहिण यमुना हिचा मोठा हातभार आहे. त्याकाळी शेती सिंचन व्यवस्थे चा शोध लावून त्याची यसस्वी अंमल बजावणी तिने केली होती. तिच्या या शोधा मुळेच तिच्या स्मरणार्थ भारतातील सर्वात मोठी सिंचन व्यवस्था ज्या नदीवर अवलंबुन आहे त्या नदीला " यमुना " हे नाव देण्यात आले आहे. ८. तुलसी विवाहः या दिवशी आम्ही तुळशीचा विवाह करतो. तुळशीचे दुसरे नाव वृंदा. ही बळी राजाचा नातु जलंधर याची पत्नी. जलंधर हा बहुजनांचा शुर राजा होता. त्याला समोरा समोर युध्दात हरवणे अशक्यप्राय होते. नैतिकता हा त्याचा सर्वात प्रबळ गुण. त्यामुळे बहुजन त्याला जिवापाड प्रेम करायचे. त्याचे नैतिक बदनामी करण्या साठी विष्णुने त्याची पत्नी वृंदा हिच्यावर बलात्कार करुन तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या घटने मुळे वृंदाने आत्महत्या केली. आमच्या नैतिकता असनार्या राजा व राणीला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरीही ते आमच्या साठी नैतिकच असतील या भावनांमुळेच आम्ही वृंदाच्या स्मरणार्थ प्रत्येक दारात वृंदावन उभा करुन अनेक चांगले गुण असणारी तुळस तिचे प्रतिक म्हणून पुजन करु लागलो. हा दिवस आम्ही वृंदेच्या स्मरणार्थ साजरा करतो. दिवाळीचे खरे अस्तित्व व इतिहास पुसण्याचा प्रयत्न कसा झाला व होतोय ते पहा. १. खरं तर दिवाळी वसुबारसे ला सुरु होते आणी वृंदा पुजनाने ( तुलसी विवाहाने ) संपायची. आज दिवाळीच्या दुस-या दिवशी व भाऊबिज ते तुलसी विवाह या दरम्यान आम्ही आमच्या कोणत्या पुर्वजांचे स्मरण करायचो याची माहिती आज आमच्या कडे उपलब्ध नाही. तीचा शोध घेणेही गरजेचे आहे. २. दिवाळीत आम्ही आमचे पुर्वज असणारे वसु, यम, यमुना, नरकासुर, कुबेर, बळीराजा, जलंधर, वृंदा या सर्वांना पुजतो. हे सर्वच जण राक्षस वंशीय आहेत. याचा अर्थ आम्ही दिवाळी साजरी करणारे प्रत्येक जण राक्षस वंशीयच आहोत. परंतु ज्यांच्याकडे खरी नैतिकता होती त्यांना धर्ममार्तंडांनी अनैतिक ठरवल्याने आम्ही आमचीच घृणा करायला लागलो. ३. दिवाळी हा सण राक्षसांच्या किंबहुना बहुजनांच्या पुर्वजांचा सन असल्याने धर्ममार्तंडांनी " देवदिवाळी " वेगळी साजरी करायला सुरुवात केली. ४ . वसुचे स्मरण करण्या ऐवजी गाय वासराची पुजा करण्यास आम्हास सांगीतले जाते. तिला आता रमा एकादशी हे नाव दिले गेले असुन या दिवसाचे महत्व हळु हळु पुसुन टाकले जाईल. ५. यमपुजनाला धन त्रयोदशी हे नाव दिले गेलयं. ६. नरक चतुर्थीला अंभ्यंग स्नान नाव दिलं गेलयं. ७. कुबेर पुजनाला लक्ष्मी पुजन नाव दिलं गेलंय आणी लक्ष्मी पुजनांच महत्व प्रचंड वाढंवलं जातय. ८. बलिप्रतिपदेला पाडवा नाव दिलं गेलयं. बळी ऐवजी नव-याला पुजा म्हणून सांगीतलं जातय. ९. यम आणी यमुना पुजनाला भाऊबिजेचे स्वरुप दिले गेलंय. १०. तुळशीचं लग्न तिचा नवरा जलंधर ऐवजी बलात्कारी विष्णू बरोबर लावलं जातय. आणी आम्ही ही ते आंधळे पणाने अंमलात आणतोय. काही दिवसांनी दिवाळीचं महत्व पुसुन टाकण्यात धर्ममार्तंड यशस्वी होतील यात शंका नाही. ते पुसायचे नसेल तर खरी व बौद्धीक दिवाळी साजरी केली पाहिजे.
A
Aarav Das
Social · Marathi · Social_Awareness
23 likes
60 shares