M
Myra Malhotra
Social · Marathi · Social_Awareness
होळी रंगभेद विसरून या रे ! गाऊ नाचू आज सारे तोडून सारे जातीबंध नाचू आज होऊन धुंद पुरणाची गोड पोळी नैवेद्य देऊ, पेटवू होळी लावून आज गुलाल भाळी देऊ समतेची हाळी दुख-दुष्टांची बांधून मोळी जाळून टाकू, खेळू होळी लिंगभेद, श्रद्धा भोळी विषमतेला मारू गोळी वाईट-साईट, कळकट-मळकट वाहू होळीस तिमिरांचे घट स्वच्छ करून समाज तनमन घडवू भूवर नंदनवन होळी माते त्रिवार वंदन ! होळी माते त्रिवार वंदन
133 likes
44 shares