Back to feed
A
Atharv Singh Social · Marathi · Social_Awareness

१० अंकी पॅननंबरला पाच भागांमध्ये विभागण्यात आलेय. ज्यातील पहिले पाच आणि शेवटचा अंक अक्षरे असतात तर उरलेले अंक संख्येत लिहिलेले असतात.  १. समजा एखाद्याचा पॅननंबर ADEPH6548C असा आहे. यातील पहिले तीन अंक हे AAA ते ZZZ यादरम्यानची तीन अक्षरे असतात.  २. चौथा अंक पॅनकार्डधारकाची स्थिती दर्शवतो. हा सर्वात महत्त्वाचा अंक असतो. अनेक पॅनकार्डवर चौथा नंबर म्हणून p हे अक्षर असते. याचा अर्थ पर्सन म्हणजेच व्यक्ती. याशिवाय चौथा नंबर म्हणून C,H,F,A,T,B,L,J आणि G ही अक्षरेही असतात.  या अक्षरांचा अर्थ खालीलप्रमाणे C – कंपनी H – संयुक्त हिन्दू कुटुंब F – फर्म A – व्यक्तींचा समूह T – ट्रस्ट B – एका व्यक्तीची  संस्था L – स्थानीय प्राधिकरण L – स्थानीय प्राधिकरण J – कृत्रिम विधिक व्यक्ति G – सरकार ३. पाचवा अंक हा पॅनकार्ड धारकाचे नाव अथवा आडनावातील पहिले अक्षर असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे नाव अमित गोएल असे असेल तर पाचवा नंबर G हा असेल. ४. पाच अक्षरांनंतर पुढील चार अंक संख्येत असतात. हे चार अंक 0001 ते 9999 यादरम्यानच्या अनुक्रमे संख्या असतात.  ५. पॅननंबरमधील शेवटचा अर्थात दहावा अंक एक अक्षऱ असते जे सुरुवातीच्या नऊ अंकाचा वापर करुन एका विशिष्ट फॉर्म्युल्याअंतर्गत निर्धारित केले जाते.

141 likes 55 shares
WhatsApp