११ एप्रिल राष्ट्रपिता महात्मा फुले (१८२७) यांची 190 वी जयंती.... त्यानिमित्त त्यांच्या कार्यास व कृतिस विनम्र अभिवादन व आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा....! भारतातील बहुजन समाज त्यांचा हक्कांसाठी, स्त्रीशिक्षण,समता यासाठी महान कार्य करणाऱ्या राष्ट्रपिता म.ज्योतिराव फूले यांचा जयंती निमित्त त्यांचा बद्दल थोडक्यात.. - जन्म ११ एप्रिल १८२७. - १८४८ साली शिक्षण चळवळीस प्रारंभ,चार वर्षात २० शाळा सुरु केल्या. - त्या काळात बहुजन समाजाला व स्त्रियांना मोफत शिक्षण दिले. -विज्ञानवादी,प्रयत्नवादी,अनिष्ठप्रथा विरोधी,स्वर्ग-नरक संकल्पना अमान्य.शिक्षण पाहून विवाह करावा असे स्पष्ट मत. - बालविवाहाला विरोध तर विधवा विवाहाला प्रोत्साहान. - चूल व मूल या निर्दयी व्यवस्थेवर प्रहार करून सवित्रीमाईना शिक्षण देऊन महिलांना शिक्षणाची प्रेरणा दिली. - १जाने.१८४८ रोजी स्त्रियांना शिक्षण देण्यात देशात सर्वप्रथम सुरुवात केली व सवित्रीमाईचा शिक्षणातून आत्मविश्वास वाढवला. - त्या कालीन भारतीय शिक्षण आयोग "हंटर" आयोगास प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यास धारेवर धरले. - स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते. - "गुलामगिरी" या ग्रंथातुन गरीब बहुजन समाजाबद्दल तळमळ मांडली आहे - बहुजनांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी विपुल प्रमाणत लिखाण केले, "शिवाजी महाराजांवर पोवाडा" ,"गुलामगिरी ग्रंथ", "शेतकऱ्यांचा आसूड" हे शेतकऱ्यानं विषयी पुस्तक, ब्राह्मणांची कसब सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक, देशातील पहिले नाटक "तृतीयरत्न".अस्यां साहित्या मुळेच देशात परिवर्तनाची प्रेरणा निर्माण झाली. - आज्ञान ,अंधश्रद्धा ,विधवा विवाह, भ्रूणहत्या,अस्पृश्यता,अत्रीशिक्षण या ज्वलंत प्रश्नसाठी आयुष्यभर लढा. - "सत्यशोधक समाज-संस्थापक", "शिवजयंतीची जनक",शेतकरी संघटना, कामगार संघटना,ई सार्वजनिक कार्यात सहभागी. "आभाळाने नाकारलेल्या पंखांना उड्डाणाचे सामर्य्थे देणाऱ्या हे महामानवा... तुझे विचार आमचे आचार होवोत" ! राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती निमित्त लाख लाख शुभेच्छा..
S
Sai Bagale
Social · Marathi · Social_Awareness
231 likes
90 shares