७५% 📈भागिदारी बायकोची 👸 👌🌷👌 नवरा बायको सुरू करतात नवा नवा संसार दहा वीस वर्ष जातात त्यातील कळायला सार नवऱ्यालाही येते कल्पना बायकोच्या महतीची म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची... कसे जोखमीचे ते नऊ महिने बायको जाते जगून नवऱ्याच्या घराण्याचा वंशाचा दिवा वाढावा म्हणून नवऱ्याला कल्पना तरी आहे का त्या अवस्थेची? म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची.... तीन-चार वर्ष बायकोची, जातात बाळाच्या शी शू ची नवऱ्याने किती वेळा घातला यांत त्याचा वेळ खर्ची? कामावरून बोललं कि नवऱ्याला का झोंबते मिरची? म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची.... किती वेळा नवरा येतो बाहेरूनच काही खाऊन आणि घरी येऊन रागावतो भाजी अळणी म्हणून करून दाखवावी नवऱ्याने साधी भाजी बटाट्याची म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची.... तक्रार, राग, करतानाही नवऱ्याचा जातो किती काळ माहितीय का त्याला किती लागतं तेल आणि डाळ? घरी करत नाही जास्त काही, तरी का मर्जी नवऱ्याची? म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची.... नोकरी करणारी असेल बायको तरीही गंमत पहा कोणत्या तोंडाने मागतो नवरा आल्या आल्या चहा? घर व नोकरी अशी दुप्पट सेवा किती आहे महत्वाची? म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची.... नवराही खरंच खपतो करून मेहनत नोकरी धंदा पण घरचं व्यवस्थापन नसेल तर होतो मोठा वांदा करा कल्पना बायकोशिवाय सहल आणि सणावारांची म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची... नवरा काय करतो, ते बायकोने दाखवलय करून नवऱ्यानेही द्यावं आता आपलं कसब दाखवून चार चाकाच्या गाडीचीही, फिरतात दोन मागची चाक म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची... स्त्री-पुरूष समानतेच्या राहिल्यात नुसत्याच गप्पा बायको जरा काही बोलली तर नवरा होतो खप्पा बायको या संस्थेने गाठलीय सगळीकडे नवीन उंची म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची ! सर्व गृहिणीनां समर्पित...👏
A
Anaya Kapoor
Social · Marathi · Social_Awareness
12 likes
54 shares